यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस; स्कायमेटचा चिंताजनक अंदाज

0
571

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा दीर्घ कालावधीत सरासरीच्या केवळ ९३ टक्केच पाऊस पडेल, असे स्कायमेटने मान्सूनपूर्व अहवालात  म्हटले आहे. यामुळे आधीच दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला आणखी चटके बसण्याची शक्यता आहे.

या यंदाच्या  मान्सूनवर अल निनोचा प्रभाव  जाणवणार आहे. यंदा सरासरी पावसाच्या ९३ टक्के पाऊस तर  जुलैमध्ये सरासरीच्या ९१ टक्के पावसाची शक्यता अहवालात  वर्तवली आहे.  भारतात सरासरी २८९ मिमी पाऊस पडतो, तर यंदा फक्त २६३ मिमी पाऊस पडण्याचा चिंताजनक अंदाज स्कायमेटने   वर्तवला आहे.

दरम्यान,  मान्सूनसंदर्भातील  हा अंदाज सरकारची झोप उडवणारा ठरू शकतो. कारण यावर्षी नोटबंदीमुळे शेतकऱ्यांच्या  मालाला उठाव मिळालेला नाही. सरकारने कर्जमाफी जाहीर  केलेली आहे, मात्र   त्याच्या   अंमलबजावणीत बोजवारा उडाला आहे. त्यामुळे कर्जमाफी योग्यपणे झालेली नाही. तर पीकविमा योजनेलाही गती मिळालेली नाही. महाराष्ट्रात यावर्षी १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे. यंदा पाऊस नाही झाला, तर परिस्थिती भयावह होण्याची शक्यता आहे.