अॅबॅकस आणि वैदिक गणितातील पिंपळेसौदागरमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा नाना काटे यांच्या हस्ते सत्कार

0
692

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – राज्यस्तरीय अॅबॅकस व वैदिक गणित परीक्षेत यशस्वी झालेल्या पिंपळेसौदागरमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पिंपळेसौदागर, रोझलँड रेसिडेन्सी येथील कविता पाटील या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अॅबॅकस आणि वैदिक गणित वर्ग घेत आहेत. पाटील यांनी स्वतः अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जिंकले आहेत. तसेच गेल्या सहा वर्षांपासून सलग फ्रँचाइझी पुरस्कार जिंकत आहेत. आता त्यांच्या ५ वर्षे ते १२ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांनी १२ व्या राज्यस्तरीय अॅबॅकस व वैदिक गणित परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत ४० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. त्यातील १६ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षिस, ६ विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक, ६ विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक, ५ विद्यार्थ्यांनी चतुर्थ क्रमांक आणि ५ विद्यार्थ्यांनी पाचव्या क्रमांकाची बक्षिसे पटकावली आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रोझलँड रेसिडेन्सीचे चेअरमन संतोष मसकर, सभासद चंदन चौरसिया, प्रशांत पाटील, लेवा पाटीदारचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

प्रथम क्रमांक -शर्वरी चव्हाण, श्रावणी भोसले, शाश्वत यादव, अशिता खंडेलवाल, पार्थ पाटील, रीशा शानबाग, आयुष पटनी, तनिष्का शर्मा, जैनील शाह, अथर्व सोमनाचे, गीत रावलानी, रुद्र पाटील, माही मेहता, आयुष कुमार, अमृता दोडला, अदिती जोशी.

द्वितीय क्रमांक – तुविजत चोपडे, नील फेगडे, मल्हार जगताप, तन्वी सूर्यवंशी, आयुष पाठक, अन्वेषा जैन.

तृतीय क्रमांक – यशश्री पाटील, जयदीप सहा, मान्या जैन,  श्रीशा कोठावदे, सयुंक्ता पानसरे, वैष्णवी सोनवणे.

चतुर्थ क्रमांक – अदिती अराली, पी. नील ईशान, विहान गन्धम, सारांश सावल.

पाचवा क्रमांक – अन्विक विश्वकर्मा, स्वरा बस्तवडे, सानिका मज्जागी, अयान गंजू, आरव आचारी

अॅबॅकस उत्कृष्ट श्रेणी- शर्विल देशमुख, आराध्य चिंतालवर, हर्षित गोडबोले, हिमायू चौधरी, उत्कर्ष सरडे, आर्यन शिंदे, रीयांश वर्मा, अन्वेषा जैन, आयुष नायक, पार्थ पाटील, परी वसईकर, स्वरा बस्तावाडे, सानिका मज्जागी, आरोही मुळे, अद्वैत भोसले, शर्वरी दादासो, शाश्वत यादव, तनिष्का शर्मा.

विशेष श्रेणी – श्रीशा कोठावदे, नील फेगडे, श्रावणी भोसले, मल्हार जगताप, अर्चित कोठावदे, अन्विक विश्वकर्मा, पी. नील ईशान, जयदीप साहा.

मेरीट- आयुष पटनी, ग्रीष्मा पाटील, श्रीनिधी.