…अश्या प्रकारे ‘त्या’ पोलीस निरीक्षकासह दोघे लाच घेताना रंगेहात सापडले

0
458

मावळ,दि.०७(पीसीबी) – न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी ५ लाखाच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई शनिवारी (दि.6) दुपारी सव्वातीनच्या वाजण्याच्या सुमारास कामशेत येथे झाली. आरोपींनी तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांपैकी एकूण साडेतीन लाख रुपयांची लाच घेतली आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना दि.21 फेब्रुवारी रोजी गोवित्री संस्थेतील बनावट मतदार यादीत फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. वडगाव मावळ न्यायालयाने त्यांना दि.25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. त्यांना न्यायालयात जामीनाबाबत मदत करण्यासाठी आरोपींनी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार दि.23 फेब्रुवारी रोजी आरोपींनी अडीच लाख रुपये घेतले. मात्र, 25 फेब्रुवारीला न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी काहीच मदत केली नाही. त्यामुळे नेवाळे यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची येरवडा पुणे कारागृहात रवानगी झाली.

दरम्यान बाळासाहेब नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर यांनी काहीच मदत न केल्याने तक्रारदार यांनी त्यांना उर्वरित रक्कम देण्याचे टाळले. नेवाळे यांचा दि.10 मार्च रोजी जामीन असल्याने मदत करतो, असे म्हणून आरोपींनी उर्वरित अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रादारांकडे केली.