अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या चिकन विक्रेत्याला दिघीतून अटक

0
1185

दिघी, दि. ११ (पीसीबी) – चिकनच्या दुकानावर चिकन आणण्यासाठी गेलेल्या एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला जवळ बोलवून तिच्यासोबत अश्लिल चाळे करणाऱ्या एका चिकन विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१०) सकाळी पावनेबाराच्या सुमारास दिघी येथील रझिया चिकण सेंटर येथे घडली.

याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चिकन विक्रेता रिझावल हक (वय ३२, रा. साईपार्क रोड, रोडे हॉस्पीटलजवळ, दिघी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पावनेबाराच्या सुमारास दिघी येथील रझिया चिकण सेंटर या दुकानात पिडित अल्पवयीन मुलगी चिकण आणण्यासाठी गेली होती. यावेळी दुकानात रिझावल होता. त्याने मुलीला काऊंटरजवळ बोलावून तिच्यासोबत अश्लिल चाळे केले. यावर घाबरलेली मुलगी घरी गेली. तिने घरच्यांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. मुलीच्या आईने तातडीने दिघी पोलीस ठाणे गाठत रिझावल विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रिझावल याला अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत.