अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती वीरेंद्र कुमार श्रीवास्तव यांचे कोरोनामुळे निधन

0
169

अलाहाबाद, दि.२९ (पीसीबी) : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वीरेंद्र कुमार श्रीवास्तव यांचे बुधवारी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्याला संजय गांधी पीजीआय लखनऊ येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना गृह जनपद महराजगंज येथे नेण्यात आले. अलोहाबाद उच्च न्यायालयाचे ते पहिले न्यायाधीश आहेत ज्यांचे कोरोनामधून निधन झाले आहे.

न्यायमूर्ती वीरेंद्रकुमार श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वीरेंद्रकुमार श्रीवास्तव यांच्या मृत्यूच्या बातमीने मन दु: खी झाले. भगवान राम यांना प्रार्थना करतो कि, त्यांनी दिवंगत आत्म्याला आपल्या चरणाशी स्थान द्यावं. आणि त्यांच्या कुटुंबियांना या दु: खावर मात करण्यासाठी कुटुंबाला सहकार्य करावे.

१ जानेवारी १९६२ रोजी महाराजगंज जिल्ह्यातील फरेंदा विभागातील पोखरभींदा गावात जन्मलेल्या न्यायमूर्ती वीरेंद्रकुमार श्रीवास्तव यांनी १९८६ मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि १९८८ मध्ये लॉ पदवी घेतल्यानंतर. 2005 साली त्यांची न्यायालयीन सेवेत निवड झाली. सन 2016 मध्ये जिल्हा न्यायाधीशपदी पदोन्नती झाली आणि 20 सप्टेंबर 2016 ते 21 नोव्हेंबर 2018 पर्यंत प्रधान सचिव पदी होते. 22 नोव्हेंबर 2018 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. त्याचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2023 पर्यंत होता.