अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली बूथ काबीज होण्याची भीती

0
58
  • कार्यकर्त्यांना केलं सतर्क राहण्याचे आवाहन

मंचर : यंदाची निवडणूक ही फक्त आपल्या शिरुर मतदारसंघापुरती मर्यादित नाही तर ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निर्णयाक ठरणारी निवडणूक आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याच बरोबर लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाची निवडणूक आहे. आणि म्हणूनच प्रत्येक बूथ आपल्यासाठी महत्वाचा आहे. विरोधकांकडून बूथ काबीज करण्याचे प्रकार घडू शकतात, त्यामुळे आपण सतर्क राहायला हवं, असं आवाहन महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना केलं.

अवसरी मध्ये आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात डॉ. कोल्हे बोलते होते. यावेळी देवदत्त निकम, सुरेश भोर, राजू इनामदार, आलू इनामदार, दिलीप पवळे, दत्ता गांजाळे, शेखर पाचुंदकर, राजाराम बाणखेले, नितीन भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, आपल्याला प्रत्येक बूथ महत्वाचा आहे. प्रत्येक बूथ वर मताधिक्य मिळणे गरजेचे आहे. आपल्याकडे मोठे नेते नाहीत. पैश्यांची ताकद नाही. पण जनतेची ताकद आहे. ऐनवेळी बूथ काबीज केला जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. बूथ वर गैर प्रकार होण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागरूक रहा, अस सांगत अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना सतर्क केलं.