अमेरिफ्लोरिडात विमान नदीत कोसळले; १३६ प्रवासी सुखरूप

0
517

न्यूयॉर्क, दि. ४ (पीसीबी) – केतील फ्लोरिडामध्ये प्रवासी विमान नदीत कोसळले. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. फ्लोरिडातील जॅक्सनविलेमध्ये हा अपघात झाला.

जॅक्सनविले येथील विमानतळावर विमान उतरत असताना धावपट्टीच्या शेवटच्या भागात असलेल्या सेंट जॉन्स नदीत कोसळले. या विमानात १३३ प्रवासी आणि ७ क्रू कर्मचारी होते. विमान नदीतील खोल पाण्यात न कोसळल्यामुळे मोठा अपघात टळला असल्याची चर्चा आहे. स्थानिक यंत्रणांकडून मदत आणि बचाव कार्य त्वरीत सुरू करण्यात आले. जॅक्सनविले शहराचे महापौर आणि नगरपाल यांनी या अपघाताची माहिती ट्विटरद्वारे दिली. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती त्यांनी दिली.