‘यंदा कर्तव्य आहे’?; वीणाने घेतली शिवच्या ‘जिजाऊं’ची भेट

0
553

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – ‘बिग बॉस मराठी २’ हा शो संपल्यानंतरही शिव ठाकरे व वीणा जगताप यांची जोडी तुफान चर्चेत आहे. चाहत्यांनाही या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेण्यात फार उत्सुकता आहे. वीणाने नुकतेच तिच्या हातावर शिवचे नाव कोरत त्याला वाढदिवसाची भेट दिली. त्यानंतर आता शिवने तिला त्याच्या गावी नेले आहे.

शिव-वीणाच्या लग्नाला शिवच्या आईचा विरोध होता अशी चर्चा होती. बिग बॉसच्या घरातील वीणाच्या काही गोष्टी शिवच्या आईला पटल्या नव्हत्या. आता वाढदिवसाचे निमित्त साधत वीणाने त्यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो शिवने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘फायनली.. राणी मीट आपली जिजाऊ,’ असे कॅप्शन शिवने या फोटोला दिलं आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरे ठरला आणि वीणाने टॉप ३ पर्यंत मजल मारली होती. ‘बिग बॉस’च्या घरात असतानाच या दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. पण शो जिंकण्यासाठी हा दोघांनी केलेला पब्लिसिटी स्टंट मानला जात होता. मात्र शिव-वीणा या चर्चा खोट्या ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. शो संपल्यानंतरही हे दोघं कायम एकमेकांच्या संपर्कात असून प्रत्येक अपडेट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत आहेत.