अमेरिकेच्या ओबामा आणि हिलरींनंतर आता भाजपच्या श्वेता शालिनी यांना ‘क्यौरा’ चे निमंत्रण

0
834

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – महाराष्ट्र भाजपच्या  प्रवक्त्या आणि उत्तर भारतीय युवा नेत्या श्वेता शालिनी यांना क्यौरा कडून  २१ जानेवारी रोजी होणाऱ्या   ‘लाईव्ह सेशन’साठी निमंत्रित करण्यात आले आहे. असा सन्मान मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.  याआधी  या व्यासपीठावरुन अमेरिकेचे माजी अध्यक्ष  बराक ओबामा यांनी  इराण अणुकरार  आणि ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशीप याबाबत  उत्तरे दिली आहेत. ‘हिलरी क्लिंटन’ यांनी तर याच व्यासपीठाचा वापर करुन ‘मुस्लिम विरोधक’ अशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली होती.   

‘क्यौरा’ हे एक ज्ञानाची देवाण घेवाण करण्याचे मोठे माध्यम आहे.  लोकांना  पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांकडून ते मिळवू शकतात.  दर महिन्याला ७ कोटी भारतीय क्यौरा च्या ज्ञानात भर घालतात. त्यांच्या   ‘ व्हीआयपी टॉकिंग सेशन’ या कार्यक्रमासाठी  क्यौरा  राजकीय नेत्यांना,शास्त्रज्ञांना,वेगवेगळ्या कंपन्यांना बोलावत असते.

ज्ञानाची देवाण घेवाण करण्याचे मोठे माध्यम असल्याकारणाने ते वेगवेगळ्या वेबसाईट वरची रहदारी मोजणाऱ्या  अलेक्सा  रँकिंग मध्ये १९ व्या स्थानी आहे. वस्तूंची मोठया प्रमाणात विक्री करणाऱ्या अॅमेझॉन या कंपनीला त्याने या रँकिंग मध्ये मागे टाकले आहे. काही महिन्यांपूर्वी क्यौरा  हे हिंदी मध्ये उपलब्ध झाले. त्यामुळे  श्वेता शालिनी  भारतीय युवकांना हिंदीत योग्य मार्गदर्शन करणार आहेत.

क्यौरा ने  भाजप नेत्या , महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन कंपन्यांच्या यशस्वी उद्योजिका श्वेता शालिनी  यांच्या पारड्यात हा मान टाकला आहे. त्यांना राजकीय, माहिती तंत्रज्ञान आणि ग्रामीण जीवनासारख्या वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव आहे.

त्या पूर्वीपासूनच क्यौरावरील  भारतीय जनता पार्टी  विषय च्या टॉप रायटर्स पैकी आहेत. या मिळालेल्या संधीमुळे त्यांचे क्यौरा वरील वर्चस्व अजून वाढणार आहे.  भाजपच्या महिला सबलीकरणाचा हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. यामुळे काँग्रेस चे क्यौरा वरील अस्तित्व संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. आणि  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी क्यौरा मधील युवकांना आकर्षित करण्यासाठी लढाई आधीच शस्त्र टाकले आहे.