निगडीत पिस्टल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

0
789

निगडी, दि. १४ (पीसीबी) – एक पिस्टल आणि २ जिवंत काडतुसांसह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी रविवारी (दि.१३) रात्री साडेआठच्या सुमारास निगडीतील पीएमपीएल बस स्टॉपजवळ असणाऱ्या संरक्षण भिंतीजवळ केली.

सिध्देश्वर धर्मदेव शर्मा (वय २२, शकुंतला बिल्डिंग, विकासनगर तरसवस्ती, देहुरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री निगडी पोलिसांना त्याच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, निगडी येथील पीएमपीएल बस स्टॉपजवळ असणाऱ्या संरक्षण भिंतीजवळ एक इसम पिस्टल घेऊन उभा आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयित सिध्देश्वर याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ७५ हजार ४०० रुपये किमतीचे एक पिस्टल आणि २ जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी त्यासह सिध्देश्वर याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनावणे तपास करत आहेत.