अमित गुप्ता यांचा नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने गौरव

0
529

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – बेटी बचाओ बेटी पढाओ पिंपरी चिंचवड संयोजक अमित गुप्ता यांना नॅशनल युथ आयकॉन पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले.

अमित गुप्ता यांना ह्युमन राईट इंटरनॅशनल फेडरेशन आणि ॲन्टी करप्शन फेडरेशन ऑफ इंडीया यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. स्वामी विवेकानंद जयंती निमित्त देशभरातुन ३० युवकांना त्यांच्या समाज कार्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले.

अमित गुप्ता यांनी अनेक मुलींना शिक्षण, लग्न या करिता मदत केली आहे. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओच्या माध्यमातून मुलींसाठी स्पर्धा, कन्या पूजन, पथनाट्य अशा अनेक सामाजिक कार्यातून समाजात बेटी बचाओ बेटी पढाओ चा संदेश पोहोचवला. स्वच्छ भारत आणि डिजीटल इंडीया या मोहीमेच्या प्रसारातही त्यांनी मोठे काम केले आहे.