अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बजावला मतदानाचा हक्क

0
717

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आज (सोमवार) सकाळी निगडी प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय, मित्रमैत्रिणींनीही मतदानाचा हक्क बजावला.

शहरातील चिंचवड, पिंपरी, भोसरी मतदारसंघातील विधानसभेच्या मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. सेलिब्रिटींनी ही मतदान करून लोकशाहीतील आपला हक्क बजावला आहे.

सोनाली कुलकर्णी आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून मतदानाचा हक्क बजावत असते. सर्व निवडणुकीतील मतदानाला सोनाली आवर्जून वेळ काढून शहरात हजेरी लावत असते.