अभिनेत्री रवीना टंडन लवकरच होणार आजी

0
540

मुंबई, दि. १० (पीसीबी) –  ‘नच बलिये’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात पुनरागमन करणारी अभिनेत्री रविना टंडन लवकरच आजी होणार आहे. रवीना टंडनची दत्तक मुलगी छाया आई होणार आहे. रविनाने छायासाठी डोहाळे जेवणाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सेलिब्रिटी न्यूट्रीशनिस्ट पूजा मखीजाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रवीना टंडनने १९९५मध्ये छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले होते. २००४साली रवीनाचे अनिल थडानीसोबत लग्न झाल्यानंतर त्यांना राशी आणि रणबीर ही दोन मुले आहेत. रवीनाने पूजा आणि छाया दोघींचाही सांभाळ अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे केलाय. २०१८साली गोव्यात छायाचा लग्नसोहळाही मोठ्या थाटात पार पडला होता. त्यानंतर तिच्या डोहाळे जेवणाची तयारीही रवीनाने स्वतः पुढाकार घेत केली आहे.