अभिनेत्री मानसी नाईक कार्यक्रम सादर करत असताना व्यक्तींनी काढली छेड

0
519

पुणे, दि.८ (पीसीबी) – मराठी अभिनेत्री मानसी नाईक पुण्यातील शिरुर तालुक्यात रांजणगाव येथे वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत छेडछाड झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मानसी नाईक पुण्यातील शिरुर तालुक्यात रांजणगाव येथे वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमासाठी गेली होती. पुण्यातील युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रम सादर करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केली. तसेच त्या व्यक्तीने तिला मंचाजवळ जाऊन धमकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मानसीकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी मानसी नाईकने मुंबईतील साकिनाका पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. साकिनाका पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी रांजणगाव पोलिसांकडे सोपवली आहे. दरम्यान या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.