अभिजित बिचुकले आता आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत

0
556

मुंबई, दि.४ (पीसीबी) – राजकारणात भल्या भल्यांना धडकी भरवणारे उदयनराजे भोसले यांनी आपण एका व्यक्तीला भीत असल्याचे मागील वर्षी सांगितले होते. आता इतरांना पळताभुई थोडी करणारे उदयनराजे कोणाला तरी भितात म्हंटल्यावर सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता. हि व्यक्ती म्हणजे साताऱ्यातील कवी अभिजित बिचुकले. याच बिचकुलेंनी आजवर नगरसेवक पदापासून ते चक्क देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीपर्यंत प्रयत्न केले आहेत.

अभिजित बिचुकले आता युवसेनाप्रमुख आणि शिवसेनेचे वरळी मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. आज ते वरळीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेच्या संपूर्ण म्हणजेचं २८८ जागा लढवण्याची घोषणा केली होती. परंतु नंतर त्यांनी माघार घेतली होती.

काही दिवसांपूर्वी अभिजित बिचुकले यांनी मोठ विधान केले होते. त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करुन दाखवेन, मी स्वत: पंतप्रधान होईन असं विधान केले होते तसेच जनतेने दोन्ही राजेंना राजे राहुद्या आणि मला निवडून द्या असं आव्हानही जनतेला केले होते.

अभिजित बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत, मात्र एकही निवडणुकीत यश आले नाही. मात्र आजही त्यांनी आपले प्रयत्न थांबवलेले नाहीत. २०१९ च्या निवडणुकीत राज्यातील विधानसभेच्या 288 जागा लढून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपणच ठरवणार, अशी गर्जना देखील या पठ्याने केली होती.