अबब… सावधान…पुणे विभागात कोरोनाचा महास्फोट, तब्बल ‘एवढ्या’ रुग्णांची वाढ

0
406

पुणे, दि. 30 (पीसीबी) : पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये गुरुवारच्या (दि.२९) तुलनेत तब्बल 18 हजार 780 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 11 हजार 872 सातारा जिल्ह्यात 2 हजार 256, सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 222, सांगली जिल्ह्यात 1 हजार 308 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 122 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या प्रसिध्दी पत्रकात माहिती ही दिली आहे.

पुणे विभागातील 9 लाख 93 हजार 630 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 लाख 69 हजार 308 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 53 हजार 409 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 22 हजार 269 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.98 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 29 हजार 505 रुग्णांपैकी 7 लाख 20 हजार 121 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 96 हजार 551 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 हजार 833 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.81 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 788 रुग्णांपैकी 79 हजार 95 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 427 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 266 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 97 हजार 892 रुग्णांपैकी 79 हजार 610 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 572 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 74 हजार 398 रुग्णांपैकी 59 हजार 238 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 918 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 66 हजार 725 रुग्णांपैकी 55 हजार 566 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 941 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 218 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 13 हजार 458 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 337, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 731, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 201, सांगली जिल्हयामध्ये 798 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 391 रुग्णांचा समावेश आहे.

विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 21 लाख 86 हजार 621, सातारा जिल्ह्यामध्ये 5 लाख 97 हजार 320, सोलापूर जिल्हयामध्ये 3 लाख 9 हजार 679, सांगली जिल्हयामध्ये 5 लाख 39 हजार 530 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 9 लाख 46 हजार 440 नागरिकांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 67 लाख 20 हजार 490 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 11 लाख 69 हजार 308 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.