‘अफगानिस्तानाच्या घटनेनंतर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे महत्व अधोरेखित झाले’ : आ. चंद्रकांत दादा पाटील

0
226

– शीख समाज्याच्या वतीने चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार..

पुणे, दि.९ (पीसीबी) : धर्माच्या आधारे ज्यांचा शेजारील देशांमध्ये छळ झालेला आहे, त्यांच्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायदा करण्यात आला. नुकत्याच अफगानिस्तानमध्ये झालेल्या सत्तांतरामुळे ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे तेथील नागरिकांना भारत हा एकमेव असा एकच सुरक्षित देश समोर दिसत आहे हे या कायद्याने सिद्ध झाले आहे. त्यामुळे केवळ हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिस्ती या समाजापुरतेच हा कायदा नसल्याचेही पहायला मिळाले. त्यामुळे देशभरातून विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार आंदोलने करून विरोध होत असताना केंद्र सरकारने अद्यादेश काढून हा कायदा लागू केला. या नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर हिंसक आंदोलने झाल्यानंतरही मोदी सरकारने हा कायदा लागू केला.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांमुळे उदभवलेल्या भीषण परिस्थितीमुळे, तेथील शीख नागरिक संकटात सापडलेले होते. अशावेळी, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भाजपा सरकारने, पवित्र श्री गुरुग्रंथ व शीख नागरिकांना सुखरूप भारतात आणले. तसेच सीएए अंतर्गत देखील शीख नागरिकांना भारतीय नागरिकत्वाचा मार्ग खुला केला. या पार्श्वभूमीवर भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार पुण्यातील शीख बंधू-भगिनींनी केला. नानापेठमधील क्वॉर्टर गेट येथील वायएमसीए हॉल येथे हा सत्कार समारंभ आयोजीत केला होता.

भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक नागपुरे, भाजपा महाराष्ट्र  प्रवक्ता अली दारुवाला, संघटक सरचिटणीस राजेश पांडे, संत सिंग मोखा, गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजीत सिंह सहानी, महेश करपे (महानगर कार्यवाह,रा.स्व.संघ, पुणे), आमदार सुनिल कांबळे, राजाभाऊ भोसले (प्रमुख, गुरुवार पेठ बौद्धविहार), दादासाहेब साळुंके (वाल्मिकी समाज पंचायत अध्यक्ष), संजय भोसले (उपाध्यक्ष, इस्कॉन मंदिर, कोंढवा), तसेच बौद्ध, सिंधी, पंजाबी आणि मेहतर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.