…अन् मारूती भापकर नावाचा कुत्रा भुंकला!

0
2250

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात काहीच किंमत नसलेला, मोहननगरमधील साधे कुत्रेही विचारत नसणारा आणि स्वतःला स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवणारा मारूती भापकर कशाकशाला आणि कुठल्या मुद्द्याला विरोध करेल याला काही ताळतंत्रच राहिलेला नाही. सुस्थितीतील रस्ते खोदून पुन्हा त्यावर १०० कोटींचा खर्च करण्यास विरोध करणाऱ्यांनाच टार्गेट करून भापकरने आपण किती खालच्या पातळीचे सामाजिक कार्यकर्ते आहोत, हे स्वतःच सिद्ध केले आहे. मोहननगरमध्ये “ढोंगी” नावाने कुप्रसिद्ध असलेल्या भापकरने १०० कोटींच्या खर्चाच्या मुद्द्यावरून प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापायी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांना मांजर म्हटले आहे. त्यामुळे त्याचा सर्वत्र निषेध होत असून, भापकरने प्रसिद्धीसाठी केलेली ही कृती म्हणजे “मारूती भापकर नावाचा कुत्रा भुंकला” अशीच असल्याची प्रतिक्रिया मोहननगरमधील जनता व्यक्त करत आहे.

चिंचवड, मोहननगरमध्ये राहणारा मारूती भापकर हा पूर्वी शिवसेनेचा कार्यकर्ता होता. नंतर त्याने शिवसेनेशी काडीमोड घेतली. त्यानंतर तो २००७ च्या महापालिका निवडणुकीत अपक्ष निवडून आला. मोहननगरमधील जनतेने फार अपेक्षेने निवडून दिलेल्या भापकरने अवघ्या काही महिन्यांतच खरे दात दाखवायला सुरूवात केली. त्यामुळे येथील जनतेवर कपाळाला हात लावण्याची वेळ आली. दरम्यानच्या काळात त्याने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर कामे करण्याचा दिखावा करून आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु, जनता ही हुशार असल्यामुळे भापकर करत असलेले ढोंग लपून राहिले नाहीत. भापकरचे खरे रूप कळू लागल्यानंतर त्यांच्या मागे असलेला एक एक कार्यकर्ता गळाला. त्यानंतर भापकर हा मोहननगरमध्ये ढोंगी सामाजिक कार्यकर्ता म्हणून कुप्रिद्ध झाला.

अशा या ढोंगी सामाजिक कार्यकर्त्याला मोहननगरमधील जनतेने सलग दोन महापालिका निवडणुकीत बुडावर आपटले. महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची पात्रता नसणाऱ्या भापकरने लोकसभा आणि विधानसभेच्याही निवडणुका लढविल्या आहेत. अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर भापकरने आपण पुन्हा शिवसेनेत जाणार नाही, याची शपथ मोहननगरमधील जनतेसमोर जाहीरपणे घेतली होती. परंतु, २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भापकरने शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भापकरला मोहननगरमधील जनतेने दिलेली “ढोंगी”ची उपमा सार्थ ठरली. या निवडणुकीत जनतेने भापकरला पुन्हा घरी बसविले. मोहननगरमधील जनतेने ओवाळून टाकलेला कार्यकर्ता, अशी भापकरची ओळख बनली आहे. आता या भापकरला प्रसिद्धीत राहण्याचा भस्म्या रोग झाला आहे.

त्यासाठी त्याने महापालिकेत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारांना हाताशी धरले आहे. त्यामुळे भापकर हा पिंपरी-चिंचवडमधील ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारांचा तारणहार बनला आहे. भापकरने प्रसिद्धीपत्रके काढायची आणि ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारांनी जाऊन पैसे उकळायचे, असा धंदा महापालिकेत तेजीत सुरू आहे. त्यातील काही वाटा भापकरही घेत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळे शिवसेनेनेही त्याची पक्षातून जवळजवळ हकालपट्टी केल्यासारखीच स्थिती आहे. तो आता सामाजिक कार्यकर्ता या गोंडस नावाखाली आपला जम बसविण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी महापालिकेच्या स्थायी समितीला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने भापकर याने समितीविरोधात वर्षभरात अनेक प्रसिद्धीपत्रके काढली. परंतु, स्थायी समितीने भापकर याला फाट्यावर मारले. भापकर करत असलेल्या आरोपांत कोणतेच तथ्य नसल्यामुळे त्याला कोणी गांभीर्याने घेतलेच नाही.

गेल्या वर्षीच्या स्थायी समितीची मुदत संपल्यानंतर भापकर हा बिळात जाऊन लपला होता. त्यानंतर तो आता पुन्हा प्रसिद्धी मिळविण्यासाठी सक्रिय झाला आहे. त्याला स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळेच कारण ठरल्या आहेत. प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात भापकर कशाकशाला आणि कुठल्या मुद्द्याला विरोध करेल याला काही ताळतंत्रच राहिलेला नाही. महापालिकेत चुकीची कामे सुरू आहेत, असे कायम बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या भापकरने आता इंद्रायणीनगरमधील सुस्थितीतील रस्ते खोदून पुन्हा त्यावर १०० कोटींचा खर्च योग्य ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ सीमा सावळे अशा खर्चाला विरोध करतात म्हणून भापकरने प्रसिद्धीपत्रक काढून सावळे यांना टार्गेट करण्याच्या नादात त्यांना मांजर म्हटले आहे. त्यातून भापकरला प्रसिद्धी मिळाली असली तरी, भापकरचा सर्वत्र निषेधही होत आहे. विशेषतः मोहननगरमधील जनता मारूती भापकर नावाचा कुत्रा भुंकला, अशीच प्रतिक्रिया देत आहेत.