अन् आमदार प्रकाश गजभिये शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत विधानभवनात अवतरले

0
587

मुंबई, दि. २२ (पीसीबी) –  ऱाज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात वेगवेगळ्या वेशभूषा करुन सरकारचे लक्ष वेधून घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये  आज (गुरूवार)  छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत अधिवेशनात अवतरले.  मराठा समाजाला आरक्षण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा  उभारण्याच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट महाराजांच्या भूमिकेत विधानभवनात प्रवेश केला.

यापूर्वी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या आंबा खाऊन अपत्य होण्याच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी भिडेंच्या वेशभूषेत त्यांनी आंदोलन केले होते. त्याचबरोबर  मोठा आंबा घेऊन ते विधानभवनात  दाखल झाले होते. या आंब्यांवर ‘संभाजी भिडे यांच्या शेतातील आंबे’, असेही लिहिलेले होते. या

तसेच संतांच्या वेशभूषेत भजन-कीर्तनाच्या माध्यमातूनही प्रकाश गजभिये यांनी आंदोलन केले होते. आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  वेशभूषेतील त्यांचे राजबिंडे व्यक्तिमत्व सर्वांचे आकर्षणाचा विषय ठरला.