खेड येथील तुरूंगातून फरार झालेल्या सराईत आरोपीची अहमदनगरमध्ये हत्या

0
1065

अहमदनगर, दि. २२ (पीसीबी) – खेड येथील तुरूंगातून फरार झालेल्या एका सराईत आरोपीची अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

राहुल गोयकर असे हत्या झालेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत आरोपी राहुल गोयकर याला एका गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर त्याची रवानगी पुण्यातील खेडमधल्या तुरुंगात झाली होती. एका महिन्यापूर्वी तुरुंग फोडून राहुल फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते, मात्र राहुल याचा अज्ञात मारेकऱ्यांनी लाकडी दांडक्याने डोक, गळा आणि गुप्तांगावर जबर मारहाण करुन त्याचा निर्घृण  केला.  दरम्यान,  गावातील जुन्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. कर्जत पोलिस ठाण्यात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.