अनुसूचित जातीतील संशोधन करणाऱ्या 861 विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर

0
157

– विद्यार्थ्याच्या वतीने राज्यातील भाजप-शिवेसना सरकारचे धन्यवाद

पिंपरी, दि.14 (पीसीबी) :- महाराष्ट्र राज्याचीत भाजप व शिवसेना सरकारने अनुसूचित जातीच्या संशोधन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) च्या विद्यार्थ्यांना सरसकट 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली. या संदर्भात विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना 8 मार्च 2023 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द सरसकट 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून पाळला आहे, असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी मह्टले आहे.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची बार्टी फेलोशिप मंजुरीसाठी प्रतीक्षेत होती. तसा प्रस्ताव तत्कालीन बार्टीचे महासंचालक यांनी बार्टी नियामक मंडळ यांच्या मान्यतेने 26 डिसेंबर 2022 आणि 1 फेब्रुवारी 2023 रोजी असे दोन वेळा मंजुरीसाठी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाकडे मंत्रालय मुंबई येथे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाचा आधार घेत सारथी आणि महाज्योती च्या धरतीवर अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सुद्धा बार्टी कडून सरसकट फेलोशिप देण्यात यावे, असे पत्र अमित गोरखे यांनी दिले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित गोरखे यांना आश्वासन दिले होते की, अधिवेशन संपताच सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांच्यासोबत चर्चा करून हा विषय मार्गी लावला जाईल. त्यांनी दिलेल्या या आश्वासनाची अखेर पुर्तता झाली आहे.

या संदर्भात अमित गोखे म्हणाले की, बार्टीला फेलोशिपसाठी अर्ज केलेल्या 861 संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. फेलोशिपच्या प्रश्नाबाबत फलनिष्पत्ती प्राप्त झाली. याविषयी महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थी आझाद मैदानावर फेलोशिपसाठी उपोषण करीत होते. त्यापैकी काही विद्यार्थी माझ्या संपर्कात होते. उपोषणाला बसण्या अगोदरपासून ते फोन करून प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न निकाली काढण्यात यावा, अशी विनंती करीत होते.या प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्यातील मातब्बर लोकांनी या विषयासंदर्भात आप आपल्या परीने पाठ पुरावा केला. अखेर या लढाईला यश मिळाले. शासनाला प्रथम पत्र देऊन सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर शासनाने हा विषय निकाली काढला आहे. विद्यार्थ्यांनी देखील भाजप-शिवेसना सरकारने धन्यवाद व्यक्त केले असून विद्यार्थ्यांच्या वतीने माझ्याकडून देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त करतो.

केंद्र व राज्य सरकार सदैव जनतेच्या हिताचे कामे करीत आहे. शेतकरी वंचित घटक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्न बाबत त्यांच्या समस्येचं निराकरण करून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले आहे. वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारत देशाला जो मूलमंत्र दिला आहे. त्याचे सामाजिकरण करून समता प्रस्थापित करण्याचे उदिष्ट साध्य केले जात आहे समाजातील सामाजिक स्थर उंचावून राष्ट्राची राष्ट्रीय अखंडता साध्य व सिद्ध करण्याचे काम भारतीय जनता पार्टीने हाती घेतलेले आहे. हे या निर्णावरून स्पष्ट होते.