अनुभव नसल्यानं भाजप मला अडचणीत आणत आहे- उद्धव ठाकरे

0
563

नागपूर,दि.१७ (पीसीबी) –हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी महाविकास आघाडीतील पक्षांची बैठक झाली. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली.

मला काहीही अनुभव नाही, त्यामुळे मी काय मार्गदर्शन करणार. मला अनुभव नसल्यानेच विरोधक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना तंगड्यात तंगडं घालण्याची सवय आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

देशात जी परिस्थिती आहे ती पाहता आपल्या मतदारसंघात तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी यावेळी आमदारांना दिला.