अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावा नाही

0
221

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : देशमुख यांनी चालू वर्षी मार्चमध्ये केलेल्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. दरम्यान, देशमुख यांना ११ ऑक्टोबरपर्यंत कारागृहात ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार न्या. एन. जे. जमादार यांच्यापुढे सुनावणी सुरू झाली. ईडीने सर्व साक्षीदारांकडून जबाब घेतले असून त्यावर ते आरोप करत आहेत, असा युक्तिवाद ॲड. विक्रम चौधरी यांनी केला. निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने दिलेला जबाब विश्वासार्ह नाही, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, देशमुख यांच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाला असून, उद्या (बुधवार) ईडी बाजू मांडणार आहे. गेले वर्षभर देशमुख हे कोठडित आहेत.