अनिल काकोडकरांपेक्षा वर्षा गायकवाड बुध्दीमान आहेत का? – विनोद तावडे

0
304

मुंबई,दि.२७(पीसीबी) – आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांगचुक यासारख्या प्रयोगशील आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे. असे असताना यावर शिक्षणमंत्र्यांचा काय आक्षेप आहे, हे अनाकलनीय आहे असं भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्ड रद्द केलं आहे. या निर्णयावर विनोद तावडे यांनी टीका केली आहे. तसेच अनिल काकोडकरांपेक्षा वर्षा गायकवाड बुध्दीमान आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. एमआयईबी अभ्यासक्रमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मराठीतून शिकण्याची संधी मिळाली होती. मात्र, सरकारने हा अभ्यासक्रमच बंद करून शिक्षणाबद्दल त्यांचे विचार किती प्रतिगामी आहेत, हेच दाखवून दिले आहे, असा आरोपही तावडे यांनी केला आहे.

दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्ड विनोद तावडे शिक्षण मंत्री आसताना स्थापन करण्यात आले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा बोर्ड रद्द केला आहे.