…अनपेक्षितरीत्या पद मिळत असतात; – चंद्रकांत पाटील

400

मुंबई, दि, १८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला भरघोस यश मिळाले असले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये अनेंक बदल करण्यात आले आहे. भाजप प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप श्रेष्ठींनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हातात प्रदेशध्यक्ष पदाचा धुरा दिला आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला भाजपकडून नवी रणनीती आखली जाणार का ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तसेच युती सरकार आले तर मुख्यमंत्री कोणाचा आणि कोण असणार ? यावर चर्चा होत आहेत. याबाबत भाजपचे नवोदित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केले आहे.

चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे भविष्यात मुख्यमंत्री पदाची आशा आहे का ? असा प्रश्न विचाराला असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुम्हाला अनपेक्षितरीत्या पद मिळत असतात. त्यामुळे अध्यक्षपदी विराजमान होईल याची देखील कल्पना नव्हती. पाच वर्षांपूर्वी मी भाजप अध्यक्ष होणार म्हणून माझ्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी शपथविधीच्या दिवशी मंत्री व्हायचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक पद तुम्हाला अनपेक्षितरीत्या मिळत असतात.

तसेच मी सरकारच्या कार्यकाळात कधीच मुख्यमंत्री पदावर दावा केला नाही. आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणी आक्षेप देखील घेतला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. माणसाला प्रत्येक गोष्ट अचानक मिळत असते. ती अचानक मिळणारी गोष्ट सर्वोत्तम माणून घ्यायची असते, असे म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबतची भूमिका मांडली.