अजित पवार यांचा पुणे शहराबाबत महत्त्वाचा निर्णय

0
259

पुणे, दि. १६ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला भेट दिली. याठिकाणी नव्यानं उभारण्यात आलेल्या सुविधा व साधनसामग्रीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी उपस्थित वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयावार भाष्य केले.

यावेळी अनेक जिल्ह्यात करोना रूग्ण आढळत असल्याने सध्या दिलासा नसल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच सकाळी ७ ते सायंकाळी ४ दुकाने सुरू राहणार आहेत. राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारले आहेच. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली तर आपण सज्ज असल्याचे अजित पवार म्हणाले. पुण्यात यापुर्वी होते तेचं निर्बंध कायम राहणार आहेत. शनिवार, रविवार बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा नाही.

पुण्यातील पाणी साठ्यावर अजित पवार म्हणाले, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ३०-३१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पुण्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागेल.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री सपत्नीक पुजा करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. सलग दुसऱ्या वर्षीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या महापूजेची संधी लाभली आहे. येत्या २० तारखेला आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरला जाणार आहेत. यावेळी त्यांना वारकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मात्र वारकऱ्यांनी राज्य सरकारची भूमिका समजून घेतल्यामुळे त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले.

बकरी ईद साठी गेल्यावर्षीसारखं धोरण कायम राहणार आहे. २१ तारखेला बकरी ईद आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदसाठी गेल्यावर्षीसारखंच धोरण असेल असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं