अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

0
439

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदावर अजित डोवाल  कायम राहणार आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. डोवाल यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये डोवाल यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘रॉ’ मध्ये महत्वाच्या पदांवर काम करण्याचा अजित डोवाल यांना अनुभव आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले. तेव्हापासून अजित डोवाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पंतप्रधान मोदींचे ते विश्वासू मानले जातात.

अजित डोवाल ‘रॉ’ मध्ये कार्यरत असताना अनेक वर्ष ते पाकिस्तानात होते. त्यामुळे पाकिस्तान संदर्भात रणनिती आखण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. २०१६ साली उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता तसेच पुलवामा हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सने केलेल्या एअर स्ट्राइकमध्येही त्यांची महत्वाची भूमिका होती.