अचानक ‘या’ देशाने कोविड मास्कचे ‘हे’ कडक नियम बदलले; पण का?

0
450

इस्त्राईल, दि.१८ (पीसीबी) : इस्त्राईलमध्ये कोविड -१९ संसर्ग दर कमी झाल्यामुळे, देशाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारीपासून ओपन एअरमध्ये फेस मास्क परिधान करण्याची सक्ती कमी केली आहे. देशभरात हे संसर्गाचे प्रमाण कमीच असल्याने आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक प्रा. हेजी लेवी यांनी सार्वजनिक आरोग्य आदेशात बदल केले आहेत. आता उघड्यावर मुखवटा (मास्क) घालण्याचे बंधन नाही. हा आदेश आज18 एप्रिलपासून सुरू होईल, असे स्पुतनिक यांनी सांगितले.

शनिवारी जागतिक कोविड -१९ च्या मृतांची संख्येने ३ दशलक्षांचा टप्पा ओलांडला. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या ताज्या अहवालातील माहितीप्रमाणे, आज पहाटे ४.३० पर्यंत जगभरात कोविड -१९ च्या १४०,३७९,९५३ची प्रकरणे समोर आली आहेत. तर, ३,००७,७०८ कोरोना मृत्यू झाले आहेत. इस्त्रायलमधील संसर्गाचे प्रमाण हे इस्त्राईलमधील यशस्वी लस मोहिमेमुळे खूपच कमी आहे आणि त्यामुळे (निर्बंध) कमी करणे शक्य आहे.

रशियन वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने गेल्या वर्षी 20 डिसेंबरपासून कोविड -१९ साठी तेथील लोकांना लसी देण्यास सुरुवात केली त्यामुळे जगातील सर्वात वेगवान कोरोना लसीकरण आतापर्यँत या देशात दिसून आले आहे.