अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार लंबू शकीलचा मुंबईत मृत्यू

0
681

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार शकील अहमद शेख उर्फ लंबू शकील याचे रविवारी (दि.२४) रात्रीच्या सुमारास मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झाले. शकील ह्दयविकाराने आजारी होता.

प्राप्त माहितीनुसार, १९९० च्या दशकात शकील अहमद दाऊदचे तस्करी आणि हवालाचे काम पाहायचा. दाऊद आणि छोटा शकीलचा तो विश्वासू साथीदार होता असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. लंबू शकील दाऊद टोळीच्या सोन्याच्या तस्करीच्या तसेच शस्त्रास्त्रे आणि स्फोटके पोहोचवण्याच्या कामामध्ये सक्रीय होता. लंबू शकील देशाबाहेर फरार झाला होता. त्याने हवाला रॅकेट उभे केले होते. त्याला २००३ साली दुबईमधून भारतात आणण्यात आले. तो दक्षिण मुंबईत बोहरी मोहल्ला येथे पत्नी आणि आई-वडिलांसोबत राहत होता.