अंगावर थुंकल्याचा बहाणा करत व्यावसायिकाला लुटले

0
186

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – तुम्ही माझ्या अंगावर थुंकला. ते धुवून द्या व मला सॉरी म्हणा, असे म्हणत एका व्यावसायिकाला लुटले. संबंधित व्यावसायिक रिक्षातून जात असताना ही घटना बुधवारी (दि. 1) सायंकाळी मोरवाडी, पिंपरी येथे घडली.

विकास जयराम पाठक (वय 34 सध्या रा. विक्रांत हॉटेल, पिंपरी. मूळ रा. बलसाड, गुजरात) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाठक हे बुधवारी सायंकाळी पाच ते पावणे सहा वाजताच्या सुमारास मोरवाडी पिंपरी येथून रिक्षाने जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी रिक्षा अडवली. ”तुम्ही माझ्या अंगावर थुंकला. ते आधी धुऊन द्या व मला सॉरी म्हणा”, असे म्हणत रिक्षा मोरवाडी येथील एका कंपनीसमोरील गार्डन जवळ नेली. तिथे फिर्यादी यांच्याकडील 15 ग्रॅम सोन्याची चेन, आठ ग्रॅम वजनाची अंगठी व रोख रक्कम असा एकूण 79 हजार 300 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत.