‘UPA’ च्या अध्यक्षपदाबाबत बाळासाहेब थोरातांनी केलं मोठं विधान….

0
255

मुंबई, दि.३० (पीसीबी) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी UPA च्या अध्यक्षपदाबाबत वक्तव्य केलं आहे कि, संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते संपादकही आहेत. महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, तरीही संयुक्त पुरोगामी आघाडीचे ( UPA ) अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच राहील. यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही.”

अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते अमित शाह यांच्या कथित भेटीबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केले. “जी भेट झालीच नाही त्यावरुन वाद निर्माण केला जात आहे. अशाप्रकारचा संभ्रम निर्माण करुन उपयोग नाही. भाजपने काहीतरी अफवा पसरवू नयेत. आपण शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करत आहोत.”

यूपीएच्या अध्यक्षपदावरून संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरु आहे.