महाराष्ट्रातील जनतेचे मरण तरी गांभीर्याने घ्या – नाना पटोले

0
351

मुंबई, दि. १० (पीसीबी) – ज्या घरात दोन दिवस पाणी होते त्या पूरग्रस्तांना केवळ दहा किलो धान्य देण्याचा सरकारी नियम ही पूरग्रस्तांची एकप्रकारे थट्टाच असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ‘विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री गांभीर्याने घेत नाहीत हे एकवेळ ठीक आहे, पण किमान महाराष्ट्रातील जनतेची मरणे तरी गांभीर्याने घ्या’, असेही पटोले म्हणाले.

एकीकडे राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेतून मतांची भीक मागण्यात व्यस्त होते. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे ते यात्रा थांबवून दिल्ली येथे गेले. अंत्यविधीनंतर दुसऱ्या दिवशी राज्याच्या संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा थांबविल्याची जाहिरातबाजी भाजपाच्या आयटी सेलने सुरू केली. असा घृणित प्रकार राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे, असा आरोप पटोले यांनी यावेळी  केला.