शिवसेनेने थांबविली ‘जन आशीर्वाद’ यात्रा; उद्धव ठाकरे, आणि आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागात जाणार

0
518

मुंबई दि. ९ (पीसीबी) – राज्यात कोल्हापूरसांगलीत आलेल्या महापूरामुळे महाजनादेश, शिवस्वराज्य अशा राजकीय यात्रा भाजपा, राष्ट्रवादीकडून थांबविण्यात आल्यानंतर आता शिवसेनेनेहीजन आशीर्वादयात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून सर्व राजकीय कार्यक्रम थांबवले आहे. येत्या एकदोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

तसेच शिवसेनेच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी त्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सांगली येथील नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रशासनासोबत धावून जा, मदत कार्यात झोकून द्या असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके संपर्कात असून ते पूरग्रस्त नागरिकांना मदत करत आहेत अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.