महाजनांना लाज कशी वाटत नाही – धनंजय मुंडे

0
582

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – कोल्हापूर आणि सांगलीमध्ये गंभीर पूर परिस्थिती असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे महाजनांवर चांगलेच भडकल्याले पहायला मिळाले.

मंत्री महोदय गिरीश महाजन सेल्फी घेण्यात मग्न आहेत. त्यांना लाज कशी वाटत नाही?, असा सवाल करत धनंजय मुंडेंनी गिरीश महाजनांवर निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! ‘त्या’ लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येते, असे म्हणत धनंजन मुंडेंनी पूरग्रस्तांच्या झालेल्या अवस्थेवर हळहळ व्यक्त केली आहे.