शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर

0
617

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना काळेवाडी-रहाटणी विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.  अशी माहिती शिवसेना शहरसंघटक हरेश आबा नखाते यांनी दिली.

काळेवाडी-ज्योतिबानगर येथील ऑक्सिकेअर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल (आश्विनी कॉलनी, पार्वती स्कुल रस्ता) येथे शनिवारी (दि. २७) सकाळी ९ वाजता शिबिराची सुरूवात होणार आहे. त्यामध्ये रक्त, लघवी, शुगर आदी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. असे नखाते यांनी सांगितले.