ज्यांचे मन, मेंदु व मनगट बळकट, तेच राष्ट्राधार – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

0
492

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – जागतिकरणाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. शारीरिक तंदुरूस्तीशिवाय या स्पर्धेस आपण तोंड देऊ शकत नाही. ज्याचे मन, मेंदू व मनगट बळकट असेलतेच राष्ट्राच्या विकासाचा आधार होऊ शकतील. सदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पांडूरंग गायकवाड यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्राचार्य गायकवाड बोलत होते. या उपक्रमात प्राचार्य गायकवाड यांच्यासह कला, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

त्यानंतर डॉ. वैशाली खेडकर यांनी स्वच्छ भारत अभियानाविषयी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. पांडूरंग लोहोटे यांनी केले. तर प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे यांनी केले व डॉ. संजय मेस्त्री यांनी आभार मानले.