सांगली, कोल्हापूर पूरपरिस्थितीला मुख्यमंत्रीचं जबाबदार – विजय वडेट्टीवार

0
533

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – ‘कोल्हापूर, सांगलीतील परिस्थीती अत्यंत भीषण आहे. शहराचा बहुतांश भाग पुराने व्यापलेला आहे. सलग चार दिवसात होत असलेली अतिवृष्टी व त्यामुळे होऊ शकणारे परिणाम याबाबत गांभीर्याने विचार केला नाही’, तसेच या सर्व परिस्थिला मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याची टिका विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.  

तसेच पुढे बोलताना नियोजन, विभागांतर्गत समन्वय याचा अभाव व नेतृत्वाने केलेले दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, याला राज्य सरकार व मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत तसेच मुंबई-बंगळूरू महामार्ग मागील पाच-सहा दिवसांपासून ठप्प आहे. पुरात सापडलेल्या लोकांपर्यंत मदत पोहचत नाही. एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा अत्यंत तोकडी पडलेली आहे. मुख्यमंत्री आधी प्रचार यात्रेत मश्गूल होते तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनीही फारसे गांभीर्याने पाहिले नाही असही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.