#BreakingNews । पुण्यात रात्री ११ वाजेनंतर बाहेर फिरण्यास बंदी; ‘या’ तारखे पर्यंत शाळा-महाविद्यालये बंद

0
700

पुणे,दि.२०(पीसीबी) – पुणे शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, करोनामुळे पुणेकरांना पुन्हा काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

पुण्यात रात्री ११ वाजेनंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.