अग्रसेन महाराज हे खरे लोकनायक – प्रकाश मुत्याल

0
525

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – धर्म आणि सत्यासाठी लढा देणारे महाराज अग्रसेन हे खरे लोकनायक होते. इतर समाज विस्थापित होत असताना आगरवाल समाज एकत्र येवून उत्सव साजरा करीत आहे हि जमेची बाजू आहे. असे प्रतिपादन  पोलीस सह आयुक्त प्रकाश मुत्याल यांनी केले.

श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड- प्राधिकरणच्या वतीने अग्रसेन महाराज जयंती निमित्ताने कै. मोरे नाट्यगृहात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष भीमसेन आगरवाल,कार्याध्यक्ष प्रेमचंद मित्तल, आगरवाल समाज फेडरेशनचे उप जिल्हाध्यक्ष विनोद बंसल, सचिव रमेश गोयल, माजी नगरसेवक मामनचंद आगरवाल, माजी शिक्षण मंडळ सदस्य श्याम आगरवाल,महिला मंडळ अध्यक्ष मंजू बंसल,सुनील जयकुमार आगरवाल,मुकेश मित्तल,खजिनदार सत्पाल मित्तल,उत्सव समिती प्रमुख वेदप्रकाश गुप्ता,विनोद मित्तल,अनिल ओमकारमल आगरवाल,अनिल आगरवाल,विजय आगरवाल,पवन गोयल, आयोजक अशोक आगरवाल, पंच कमिटी सदस्य रामधारी आगरवाल,रामअवतार आगरवाल,माजी सचिव के एल बंसल,वेदप्रकाश माइचंद गुप्ता आदी उपस्थित होते.

यावेळी टॉयलेटफेम अभिनेते सुधीर पांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.सुधीर पांडे आणि सह कलाकारांनी” वेलकम जिंदगी” हे हिंदी नाटक सादर केले.कर्मयोगी लोकनायक महाराजा अग्रसेन या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

मुत्याल पुढे म्हणाले कि, परदेशात सगळे कामात किंवा मोबाईल वर व्यस्त असतात त्यामुळे ते क्वचितच हसतात भारतीय संस्कृतीमध्ये सगळे नागरिक एकत्र येवून उत्सव साजरे करतात. हि आजच्या युगात मोठी बाब असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्पाल मित्तल तर आभार विनोद बंसल यांनी मानले.