दु:ख उराशी बाळगून जगणे नकोसे वाटले.अन् जीवन संपविण्यासाठी थेट नदी पात्र गाठले

0
412

नाशिक, दि.२ (पीसीबी) – प्रेमभंगाचे दु:ख उराशी बाळगून जगणे नकोसे वाटत होते. जीव संपविण्यासाठी तिने थेट सोमेश्वर येथील नदीपात्र गाठले.दोनदा प्रयत्नही करूनही पाहिला पण, हिंमत झाली नाही. दुपारी १२ ते साडेतीन वाजेपर्यंत ती सर्वस्व संपल्याचे दुख: मानून तिथेच बसली.

मिळालेल्या माहितीनुसार, जीवन संपविण्यासाठी तिने थेट सोमेश्वर येथील नदीपात्र गाठले. दोनदा प्रयत्नही करूनही पाहिला पण, हिंमत झाली नाही. दुपारी १२ ते साडेतीन वाजेपर्यंत ती सर्वस्व संपल्याचे दुख: मानून तिथेच बसली. ही बाब एका रिक्षाचालकाने निर्भया पथकाला कळविली. पोलिस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले, युवतीला सुखरूप घरापर्यंत पोहोचविले. त्यांनी युवतीशी चर्चा केली. मात्र, ती काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. सूर्यवंशी यांनी युवतीच्या मोबाइलवरून तिच्या मैत्रिणीकडून माहिती घेतली. मित्राबरोबर झालेल्या वादामुळे युवतीने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. सूर्यवंशी यांनी युवतीची समजूत काढून. तसेच, त्या मित्रालाही फोनवरून समजून सांगितले. रिक्षाचालकासह निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.