…तर घटस्फोटाच्या खटल्यातील एका व्यक्तीला दुसरे लग्न करता येऊ शकते – सर्वोच्च न्यायालय

0
1117

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – घटस्फोटाच्या खटल्यात पतीपत्नीमध्ये खटला मागे घेण्यासंबंधी तडजोड झाली असेल, तर घटस्फोटाची याचिका न्यायालयात  प्रलंबित असली तरी त्यातील एका व्यक्तीला दुसरे लग्न करता येऊ शकते, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.  

घटस्फोटाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्याआधी दुसरे लग्न रोखण्यासंबंधी कायदा लागू होत नाही. हिंदू अॅक्टनुसार, घटस्फोटाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका प्रलंबित असेल, तर दोघांपैकी एकाला दुसरे लग्न करता येत नाही. परंतु, जर पक्षकाराने तडजोडीच्या आधारावर खटला न्यायालयात पुढे न चालवण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यातील एका व्यक्तीचे दुसरे लग्न मान्य आहे, अशी हिंदू मॅरेज अॅक्टच्या कलम १५ मध्ये तरतूद आहे.

लग्नानंतर पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तीस हजारी न्यायालयाने १ ऑगस्ट २००९ साली पत्नीच्या बाजुने निर्णय दिला. त्यानंतर पतीने  उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात  आव्हान दिले. यादरम्यान,  पतीपत्नी मध्ये   तडजोडीचा निर्णय झाला. १५ ऑक्टोबर २०११ रोजी पतीने ठरलेल्या तडजोडीनुसार याचिका मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. परंतु, त्याने खटला प्रलंबित असताना ६ डिसेंबर २०११ रोजी दुसरे लग्न केले होते.  याबाबतच्या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला आहे.