पिंपळेसौदागर येथे ‘सायकल सुविधा प्रकल्पा’चे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

0
1596

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी लिमिटेडतर्फे राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज (रविवारी) करण्यात आले. पिंपळेसौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरील कुंजीर क्रीडांगण येथे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहूल जाधव, नगरसेवक शत्रुध्न काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदींनी सायकलवर फेरफटका मारून या प्रकल्पाचा शुभारंभ केला.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शत्रुध्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, शितल काटे, विठ्ठल काटे, सागर अंगोळकर आदी उपस्थित होते.

पि्ंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पायलट प्रोजेक्ट म्हणून पिंपळेगुरव व पिंपळेसौदागार भागात ‘बायसिकल शेअरिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. उद्योगनगरीतील हा पहिलाच प्रकल्प असून पिंपळेगुरव आणि पिंपळेसौदागर या भागात तो प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. पिंपळेसौदागरमधील १९ आणि पिंपळेगुरूवमधील १५ ठिकाणी असा एकूण ३४ ठिकाणी तो राबविला जाणार आहे.

पहिल्या टप्यात या उपक्रमात सहाशे सायकली उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. दरम्यान, त्यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.