अजित पवारांचे पोलिसांना चिमटे

0
430

पिपंरी, दि. ८ (पीसीबी): हेल्थ वॉचमुळे तुमच्या आरोग्याची माहिती तर मिळेलच पण तुमचे ठिकाणही कळणार आहे, असा चिमटा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना काढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तालयात स्मार्ट वॉच वितरणाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, 2016 मध्ये मोदी सरकारकडून नोटबंदी करण्यात आली, तेव्हा आम्ही विरोध केला होता, कारण कॅशलेस होणं आपल्या देशाला तेव्हा शक्य नव्हतं. आता त्याचा काय फायदा झाला? याच्या खोलात मी जाणार नाही. पण एक हजाराची नोट बंद होऊन दोन हजारची नोट आली. तेव्हा असं समजलं की, त्या नोटमध्ये चिप लावली आहे. त्यामुळे ती दोन हजाराची नोट कुठे ठेवली आहे, हे आता समजणार, अशी अफवा उठली होती. पोलिसांना देण्यात आलेल्या स्मार्ट वॉचच्या वितारणावरून अजित पवारांनी पोलिसांना चिमटा काढला. ते म्हणाले की, हेल्थ वॉचमुळे तुमच्या आरोग्याची माहिती तर मिळेलच पण तुमचे ठिकाणही कळणार आहे, हीच गोम आहे.

दरम्यान, अजित पवार पोलिसांना उद्देशून म्हणाले की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडांचा बंदोबस्त करा, त्यांचा नायनाट करा, परंतु सर्वकाही कायद्याच्या चौकटीत राहून करा. कारवाई करताना संबंधित व्यक्ती कुठल्या पक्षाची, कुठल्या गटाची आहे, हे पाहू नका. जर कुणी गुन्हेगारी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. कोणताही राजकीय दबाव सहन नका करु. माझा सोडून कोणाचा फोन आला तर मला सांगा, त्याच्याकडे मी पाहतो.
दरम्यान पवार म्हणाले की, पोलिसांना सुविधा देणं गरजेचं आहे. मी ते करतोय, लवकरच या आयुक्तालयाला महाराष्ट्रातील बेस्ट आयुक्तालय करणार आहे. पण त्या इमारतीतून बेस्ट काम व्हायला हवं …