डॉ . डी वाय पाटील पब्लिक स्कूल, पिंपरीमध्ये फिट इंडिया स्कूल विक उत्सव

0
406

पिंपरी,दि.३०(पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ केला. या वेळी त्यांनी फिट इंडिया चळवळ ही जनआंदोलन बनले पाहिजे, असे आवाहन देशातील जनतेला केले. फिटनेस ही आता काळाची गरज बनली असून, फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून आपण निरोगी भारताच्या दिशेने आता पाऊल उचलले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

डॉ . डी वाय पाटील पब्लिक स्कूल, पिंपरीमध्ये दिनांक 18 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 दरम्यान फिट इंडिया स्कूल आठवडा उत्सव साजरा करण्यात आला . या उत्सवात शाळेच्या प्राचार्या , विदयार्थी , पालक आणि शिक्षकांनी सर्व उपक्रमात सहभागी झाले . फिट इंडिया स्कूल विक अंतर्गत शाळेने वक्तृत्व स्पर्धा ,आहार आणि पोषण , चित्रकला स्पर्धा , फन अँड फिटनेस , ऐरोबिकसी , झुंबा डान्स , योगा , निबंध , कविता , जाहिरात , विविध खेळ स्पर्धा आयोजित केले होते . शाळेच्या प्राचार्या मृदुला महाजन , शिक्षक , विदयार्थी , पालक आणि शिक्षकेतर ह्यांनी उस्फुर्तपणे सर्व स्पर्धांमध्ये भाग घेत फिट इंडिया स्कूल विक साजरा केला आहे . शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी सर्वाना फिटनेसचे महत्व समजावून सांगितले .( फिटनेस का डोझ अधा घंटा रोज )हे मंत्र नेहमी लक्षात ठेवण्यास सांगितले आहे.

दरम्यान शाळेच्या क्रीडा विभाग प्रमुख पार्वती बाकळे आणि क्रीडा शिक्षक संतोष बुटना, अक्षयकुमार परदेशी ह्यांनी फिट इंडिया स्कूल विकचे पूर्ण नियोजन केले होते . सदरच्या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ . सोमनाथ पाटील सरांचे मार्गदर्शन लाभले .