संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या लडाख-श्रीनगर दौऱ्याला सुरवात

0
475

नवी दिल्ली,दि.१७(पीसीबी) – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लेह आणि श्रीनगरच्या दौऱ्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यासाठी लडाखला पोहचले आहेत. यादरम्यान, ते लडाख व जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे देखील आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करत त्यांच्या दोन दिवसीय लडाख आणि श्रीनगरच्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी ट्वीट केलं की, ‘मी दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौऱ्यासाठी रवाना होत आहे. मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व त्या क्षेत्रात तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधण्यासाठी दौरा करत आहे.’

दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लडाखमधील एलएसी आणि काश्मीरमधील एलओसीवरील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आज सकाळी राजनाथ सिंह लेह विमानतळावर पोहोचले. तेथून ते लडाखमध्ये दाखल झाले आहेत.