पी. चिदंबरम यांना घरी स्थानबद्ध करा – सर्वोच्च न्यायालय

0
425

नवी दिल्ली,  दि. २ (पीसीबी) – माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा कनिष्ठ न्यायालयाने  जामीन अर्ज फेटाळला. तर त्यांना तिहार तुरुंगात पाठवू नये, त्याऐवजी त्यांना घरी स्थानबद्ध करावे, असे आदेश  सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे  चिदंबरम यांना तूर्तास दिलासा  मिळाला आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी अंतरिम जामीन मिळावा, अशी विनंती  चिदंबरम यांनी केली आहे.  त्यावरही निर्णय घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले आहेत.  चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाणार नाही आणि जर ट्रायल कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला तर ते ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीतच राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले की,  चिदंबरम ७४ वर्षांचे आहेत आणि त्यांना घरी स्थानबद्ध केले जाऊ शकते. यामुळे कोणाला काही समस्या नसायला हवी.  दरम्यान, चिदंबरम यांनी आपल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट दाखल करणे आणि कोठडीत पाठवण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.