“मला काय करायचे ते मी ठरवणार”; अमोल कोल्हेंच्या भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया

0
583

सातारा, दि. २ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भासले यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. हा प्रवेश जवळजवळ निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र, यावर थेट भाष्य करणे उदयनराजेंनी टाळले जरी असले तरी काही अटिंवर प्रवेश करेन असे त्यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितले आहे.

आज (सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंची मनधरणी करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंना साताऱ्याला पाठवले  होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले कि, मी माझ्या अटींवर प्रवेश करेन. मी काय कराव हे कुणी दुसरे सांगू शकत नाही. मला काय करायचे ते मी ठरवणार आहे. मला शोभेल अस आणि लोकहिताच्या अटी मान्य झाल्यास मी निर्णय घेईन. शेतकऱ्यांसाठी विमा योजनेची अट आहे. मी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. त्यांनी ठरवाव आणि मला सांगाव. जायचे असेल तर हो, नसेल तर नाही, असे उदनराजे भोसले म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, उद्योग बंद पडत आहेत. त्यांना पुन्हा कसं सुरू करता येईल, यावर विचार करावा लागेल. अन्यथा भारतावर दिवाळखोरीची वेळ येईल. आपण पैसे कोठून आणणार? आपण पैशाच नाटक करू शकत नाही.

दरम्यान नोटबंदी आणि जीएसटीवर त्यांच्या भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी आपण आजही नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर नाराजच असल्याचे स्पष्ट केले आहे.