माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

0
443

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – माजी पतंप्रधान मनमोहन सिंग यांची सोमारी राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यंदा ते राजस्थानमधून ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. काँग्रेस नेते महेश जोशी यांना मनमोहन सिंग यांच्या निवडीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर सिंग यांचा कार्यकाळ ३ एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे.

यासंदर्भात राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करुन घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, राजस्थानमधून माजी पतंप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. राजस्थानमधून त्यांनी निवडून जाणे ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे प्रचंड ज्ञान आणि मोठ्या अनुभवाचा राजस्थानच्या जनतेला मोठा फायदा होईल.

काँग्रेस माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना राजस्थानातून राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट होताच भाजपाने त्यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.