मुंबईत अमित ठाकरे- रोहित पवार भेट; चर्चांना उधाण

0
512

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांची मुंबईत आज भेट झाली. एकीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वाढदिवशी कोणासोबत ‘डिनर डेट’ करणार, याची चर्चा रंगलेली असताना अमित आणि रोहित यांची ‘लंच भेट’ झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या भेटीचा तपशील समजू शकलेला नाही.

राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली होती. त्यानंतर  आता अमित ठाकरे आणि रोहित पवार यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुंबईतील फिनिक्स मिल कंपाऊंड मधील इंडिगो हॉटेलमध्ये दोघांनी एकत्र जेवण घेतले.

आजच सकाळी रोहित पवार यांनी फोन करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमित ठाकरेंनी तात्काळ होकार दिल्यामुळे दुपारी दीड वाजताच्या सुमारास अमित आणि रोहित यांची भेट झाली. दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.