आघाडीला कमी जागा मिळाल्यास जनताच म्हणेल, ‘दालमे कुछ काला है’ – जयंत पाटील

0
428

सांगली, दि. २१ (पीसीबी) – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला २२ ते २३ जागा मिळतील, त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर, जनताच म्हणेल ‘दालमे कुछ काला है’, हा निकाल जनतेला पटणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. देशात मोदी लाट नसताना भाजपला ३०० जागा मिळणे अशक्य आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  दुष्काळी भागातील नागरिकांनी  जनावर-शेळ्या-मेंढ्यांसह मोर्चा काढला.  यावेळी पाटील पत्रकारांशी बोलत होते.

पाटील पुढे  म्हणाले की, एक्झिट  पोलमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने घाबरून जाऊ  नये.  राज्यात  महाआघाडीला किमान २२ ते २३ जागा मिळणे अपेक्षित आहे.  त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या, तर मात्र जनता म्हणते तसे काही तरी गडबड आहे, असे म्हणायला वाव आहे.

प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५  मतदान केद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील स्लिपांची मतमोजणी केली जाणार आहे. तर १००  टक्के स्लिपांची मतमोजणी झालीच पाहिजे, असे आमचे मत आहे. एक्झिट पोल प्रमाणे निकाल  लागला,  तर नक्कीच हा निकाल मॅनीप्लेटेड निकाल असेल, असे पाटील म्हणाले.